शब्दाने शब्द वाढला की
वाढत जातो कलह
नकळतच नाती दुरावून
वाढत जातो मग विरह
*म्हणून शांत राहणं चांगलं*
नकळत ओठांतून घायाळ करणारे
शब्द सुटतात
समोरच्याच्या मात्र थेट
काळजात ते घुसतात
*म्हणून शांत राहणं चांगलं*
शब्दांनी जुळतात परस्परांशी
प्रेमळ अशी नाती
आणि शब्दांनीच ओली होतात
डोळ्यांची पाती
*म्हणून शांत राहणं चांगलं*
मन तोडण्यासाठी शब्दांना असते
खूपच धार
त्या धारेने मग होतात नात्यांवर कधी न पुसणारे वार
*म्हणून शांत राहणं चांगलं*
बोलणारा आपले शब्द
सहजच विसरून जातो
ऐकणारा मात्र ह्रदयाच्या कोपऱ्यात
त्यांच घर बांधून बसतो
*म्हणून शांत राहणं चांगलं*
आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात
पण एक अयोग्य शब्द
कोरून मात्र ठेवतात
*म्हणून शांत राहणं चांगलं*
*शांत राहणं चांगलं*....🙏
Comments
Post a Comment