Skip to main content

बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते;

बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते;
तुमची काय आणि आमची काय,
'almost same' असते.

Love marriage वाल्यांची सुद्धा,
परिस्थिती वेगळी नसते;

स्वतःच शोधून आणल्यामुळे,
जास्तच पंचाईत असते.

तुमचे काय आणि आमचे काय,
बायकोशी जेमतेम च पटत असते;

अवघड जागचे दुखणे,
सांगायची सोय नसते.

आपल्या सगळ्याच गोष्टींवर,
तिचे बारीक लक्ष असते;

आपल्या इतकी तिची,
स्मरणशक्ती वाईट नसते.

बायको दुणे सासू सासरे
बायको त्रिक मेव्हणे,
लग्नानंतर वर्षात कळते
'संत रामदास' खरे शहाणे !

तरी सांगतो मनापासून,
आप-आपला अनुभव पहा तपासून..

तरी सांगतो मनापासून,
आप-आपला अनुभव पहा तपासून..

आई खालोखाल बायकोलाच,
आपली खरी काळजी असते;

आपल्याला काही tensions असतील,
तर तिला सुद्धा झोप नसते.

आपल्या स्वप्नपूर्ती साठी,
ती करते बरेच त्याग;
पण लहान सहान गोष्टींसाठी,
आपण करतो तिचा राग !

मुलं मोठी करण्याचे काम,
तिच्याकडे 'out - source' असते;

संकट समयी धीर देणारी,
ती 'reserved force' असते.

कितीही चेष्टा केली तरी,
बायको नसते राग धरत;
आपल्याला जीव लावत राहते,
पुन्हा-पुन्हा,परत परत.

आपल्या संसाराच्या 'tree' चं,
बायको हेच 'stem' असते;
तुमची काय आणि आमची काय,
'almost same' असते.

आणि,

आपली कितीही चांगली असली
.
.
आपली कितीही चांगली असली;

तरी इतरांची अधिक छान भासते !😉🤨

Comments

Popular posts from this blog

शब्दाने शब्द वाढला की

शब्दाने शब्द वाढला की वाढत जातो कलह नकळतच नाती दुरावून वाढत जातो मग विरह *म्हणून शांत राहणं चांगलं* नकळत ओठांतून घायाळ करणारे शब्द सुटतात समोरच्याच्या मात्र थेट काळजा...

आईच्या माघारी बहीणच आई असते देवा !*

*आईच्या माघारी बहीणच आई असते देवा !* ( भाऊबीज , रक्षाबंधन आणि ओवाळणी ) *कवी : प्रा.विजय पोहनेरकर* *कोण म्हणतं बहीण* *ओवाळणी साठी ओवाळते* *भावासाठी बिचारीचे* *अंतःकरण तळमळते*  *भाऊराय...