Skip to main content

बशीतल्या पावाला... मिसळ म्हणाली लाजून

बशीतल्या पावाला...
मिसळ म्हणाली लाजून
असा दूर का उभा तू
मी तुझ्यासाठी बसले सजून
पाव म्हणाला दुःखी होऊन
तू तर तिखटजाळ...
सांग कशी जुळायची
तुझी आणि माझी नाळ
मी असा पांढरा फटक
तू किती छान सजली
गालावरती गं तुझ्या
टोमॅटोची लाली
कोथिंबीरीचा हिरवा शालू
नवरी छान लाजली...
दंडात रुतली गं तुझ्या
कांद्याची लाल चोळी...
मिसळ म्हणे पावराजा
असं काही नसतं
एकदा प्रेम झालं की,
ते कोणावरही बरसतं...
तू किती साधा अन
तू किती सिंम्पल...
तूच माझा पाव अन
मी तुझी सँम्पल.....
पाव म्हणाला मिसळीला
आता आपलं एकच गांव
तुला मला एकच नांव
मिसळपाव मिसळपाव.....

*सगळ्या मिसळ पाव प्रेमिंना*
*खास पावसाळ्यात👍🏻*
😋😉

Comments

Popular posts from this blog

शब्दाने शब्द वाढला की

शब्दाने शब्द वाढला की वाढत जातो कलह नकळतच नाती दुरावून वाढत जातो मग विरह *म्हणून शांत राहणं चांगलं* नकळत ओठांतून घायाळ करणारे शब्द सुटतात समोरच्याच्या मात्र थेट काळजा...

बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते;

बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते; तुमची काय आणि आमची काय, 'almost same' असते. Love marriage वाल्यांची सुद्धा, परिस्थिती वेगळी नसते; स्वतःच शोधून आणल्यामुळे, जास्तच पंचाईत असते. तुमचे काय आण...

आईच्या माघारी बहीणच आई असते देवा !*

*आईच्या माघारी बहीणच आई असते देवा !* ( भाऊबीज , रक्षाबंधन आणि ओवाळणी ) *कवी : प्रा.विजय पोहनेरकर* *कोण म्हणतं बहीण* *ओवाळणी साठी ओवाळते* *भावासाठी बिचारीचे* *अंतःकरण तळमळते*  *भाऊराय...